मेष : आज तुमचे वरिष्ठ तुमच्यामुळे खुश असतील, त्यामुळे तुमची प्रगती होऊ शकते. आज दुपारनंतर काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाची बातमी समजेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यापारात लाभ होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. कामाची धावपळ वाढेल.
वृषभ : आर्थिक विषयांवर बोलायचे झाले तर आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहाणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना दुपारनंतर घडेल. वणाघेवाणीच्या व्यवहारात थोडे सावध राहा, अन्यथा यात मोठे नुकसान होऊ शकते. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. बोलण्यातून कामे मिळवाल.
मिथुन : आज तुम्ही जमीन किंवा जमिनीशी संबंधित देवाणघेवाण करू शकता. दैनंदिन व महत्त्वाची कामे रखडणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. आज कोणत्याही वादात पडू नका. दुपारनंतर काहींना मानसिक ताणतणाव राहणार आहेत. कफविकाराचा त्रास जाणवू शकतो.
कर्क : वाहन वापरत असाल तर आज वाहन चालवताना विशेष काळजी घ्या, अपघात होऊन नुकसान होऊ शकते. मनोबल उत्तम राहणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. कुटुंबात एखाद्या जुन्या मुद्द्यावरून वाद होतील, पण तुम्ही तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवा. दुपारनंतर काहींना विविध लाभ होतील. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील.
सिंह : तुमची प्रकृती थोडी बिघडू शकते. त्यामुळे इतर चिंता सोडून तुमच्या आरोग्यावर लक्ष द्या, आणि वेळेवर उपचार करावेत. कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. दुपारनंतर तुमचा आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. कौटुंबिक वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा. कामात सुयश लाभेल. मानसिक व्यग्रता जाणवेल.
कन्या : तुम्ही नवीन व्यवसायात पैसा लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. दुपारनंतर अस्वस्थता कमी होणार आहे. दैनंदिन कामे दुपारनंतर करावीत. तुमच्या जवळच्या लोकांवर विश्वास ठेवा आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. नातेवाईक भेटतील. व्यसनाच्या आहारी जाऊ नये.
तुळ : जमिनीशी संबंधित एखादा वाद जर कोर्टात चालू असेल तर यात तुम्हाला यश मिळेल, तुम्ही हा खटला जिंकाल. हितशत्रूचा त्रास होईल. दुपारनंतर काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागेल. आज तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. प्रवास टाळावेत. अस्वस्थता जाणवेल. नवीन स्नेहसंबंध जोडले जातील.
वृश्चिक : आज एखाद्या गोष्टीवरून तुमचे मन फार काळजीत असेल. एखाद्या समस्येमुळे तुम्ही मानसिक तणावात असाल.दुपारनंतर तुमचा उत्साह वाढणार आहे. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आज एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून दुःखद बातमी मिळू शकते. मानसिक सकारात्मकता वाढेल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल.
धनु : वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत वाद होतील. दुपारनंतर काहींना अनावश्यक खर्च होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य कमी होईल. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. आज तुम्हाला एखाद्या अघटित गोष्टीबद्दल भीती वाटेल, त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. गोड बोलून कामे मिळवाल.
मकर : जर तुम्ही एखादा व्यापार करण्याचा विचार करत असाल तर व्यापार वाढवण्यासाठी आज प्रवास करावा लागू शकतो. मानसिक सौख्य लाभणार आहे. प्रवासात सौख्य लाभेल. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. तुम्ही एखाद्या लग्नसोहळ्या भाग घेऊ शकता, त्यामुळे मन संतुष्ट होईल. संततीसौख्य लाभणार आहे. बौद्धिक चलाखी वापराल.
कुंभ : आज तुमचे आणि जोडीदाराचे आरोग्य चांगले राहील, त्यामुळे तुमचे मन संतुष्ट राहील. गुंतवणुकीच्या कामात दुपारनंतर सुयश लाभेल. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात दीर्घकाळापासून सुरू असलेला एखादा वाद आज संपून जाईल. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. झोपेची तक्रार जाणवेल.
मीन : कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीमुळे तुम्ही फार चिंतेत राहाल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. दुपारनंतर नातेवाइकांच्या गाठीभेटी पडणार आहेत. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर त्यात तोटा होऊ शकतो आणि हे नवीन काम तुमच्या हातातून सुटू शकते. सौख्य व समाधान लाभेल. चांगला आर्थिक लाभ होईल.
















