मेष : दिवस चांगला जाईल. सार्वजनिक कामात सहभाग वाढेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. तुमच्या मनाला शांती मिळेल. तुमच्या कार्याची उचित दखल घेतली जाणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधाल. कामाचा ताण असला तरी उत्साही राहणार आहात. आजचा दिवस रचनात्मक कामांमध्ये सहभागी होऊन नाव कमावण्याचा असणार आहे.
वृषभ : आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागेल. एखादा भाग्यकारक अनुभव येईल. अपेक्षित पत्रव्यवहार होईल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. कामाचा ताण वाढणार आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. आजचा दिवस चिंताजनक असणार आहे. आज तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
मिथुन : आज तुम्हाला ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल. मानसिक अस्वस्थता त्रास देईल. काहींना नैराश्य जाणवेल. आज व्यवसायात थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. महत्त्वाचे व्यवहार शक्यतो आज नकोत. दैनंदिन कामास विलंब लागणार आहे. वाहने जपून चालवावीत. शांत व संयमी राहावे. आजचा दिवस व्यवसायात फायदेशीर ठरणारा आहे.
कर्क : आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. अनेक कामांत सुयश मिळवणार आहात आरोग्य उत्तम राहणार आहे. व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुमचा भागीदार तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. भागीदारीमध्ये फायदा होणार आहे. मुलांना नोकरी लागल्याने त्यांना घरापासून दूर जावे लागू शकते.
सिंह : दिवस चांगला जाईल. काहींना आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहणार आहेत. तुमचे मनोबल कमी राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश होतील. तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात करू शकणार आहात. प्रवासात काळजी हवी. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या इच्छेनुसार लाभ मिळाल्याने आनंद होईल.
कन्या : व्यवसायात पैसे गुंतवलेत तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. प्रियजनांशी सुसंवाद साधणार आहे. कामाचा ताण असला तरी उत्साही राहणार आहात. आज तुमच्या व्यवसायासाठी मोठा निर्णय घेऊ शकता. अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. सहकाऱ्यांवर तुमचा प्रभाव पडणार आहे. प्रवास सुखकर होतील. तुम्ही कोणतीही जोखीम उचललीत तर तुमचे नुकसान होऊ शकते.
तूळ : आज एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी भांडण होऊ शकते. मानसिक प्रसन्नतेने कार्यरत राहणार आहात. उमेद वाढणार आहे. भांडणाच्या वेळी तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कामाचा ताण कमी करू शकणार आहात. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. चिकाटी वाढणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणालाही भागीदार बनवणे टाळावे.
वृश्चिक : आज व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आज जोडीदाराकडून तुमची फसवणूक होऊ शकते. प्रवास सुखकर होणार होईल. मनासारखी घटना होणार आहे. आज व्यवसायाशी संबंधित काही योजना बनवल्यास त्याचा चांगला फायदा होईल.
धनु : आरोग्य चांगले राहील. कामाचा ताण राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील. मन आनंदी व आशावादी राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील. मनोबल उत्तम राहील. व्यवसायातील जुनी येणी वसूल होतील. आजचा दिवस व्यवसायात प्रगतीचा असेल. तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंदी असेल.
मकर : आजचा दिवस चढ-उताराचा असेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात काही मोठा नफा मिळू शकतो. तुम्ही अत्यंत उत्साहाने कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे विचार इतरांना पटतील. प्रवासाला जाणार असाल तर वाहन जपून चालवा, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे.
कुंभ : शेअर मार्केट किंवा सट्टा मार्केटमध्ये स्वारस्य असलेल्या व्यापाऱ्यांना नफा मिळू शकतो. काहींचा आराम करण्याकडे कल राहणार आहे. मनोबल कमी राहील. प्रवास टाळावेत. आज महत्त्वाच्या कामात काही अडचणी येतील. तुम्ही काही व्यावसायिक कामासाठी प्रवासाला जाणार असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
मीन : ऑफिसमध्ये बरेच दिवस अडकलेले काम पूर्ण होईल.अपेक्षित धनलाभ होईल. व्यवसायतील आजचे तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. तुमचे मन सकारात्मक असणार आहे. व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात अधिक पैसे मिळविण्याचा मोह टाळावा. काहींची बौद्धिक प्रगती होईल. वैचारिक परिवर्तन होणार आहे. नशीब तुमच्या बाजूने राहिल्याने तुम्हाला एकामागून एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील.