मेष : आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद – विवादा पासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. स्वभावातही चांगले बदल दिसून येतील. आज कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ होण्याची शक्यता. परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
वृषभ : आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अधिक मेहनत करावी लागेल, तरच त्यांना यश मिळू शकतं.
मिथुन : आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं सावध रहा. अचानक धनलाभाची शक्यता. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कोर्टाची काही कामं सुरु असतील तर आज तुम्हाला त्यात निराशेचा सामना करावा लागेल.
कर्क : नोकरी – व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. फार हट्टीपणा करू नका. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे. जर तुमच्या आईला डोळ्यांशी संबंधित काही समस्या असतील तर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
सिंह : नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणे टाळा. पोटाचे त्रास संभवतात. वातूळ पदार्थ खाणे टाळावे. हित शत्रूपासून सावध राहावे. आज तुमच्या व्यवसायात पैशाचे व्यवहार करत असाल तर तुमच्या भावाचा सल्ला अवश्य घ्या.
कन्या : आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. आजचा दिवस मजेत घालवाल. जुगारातून लाभ संभवतो. कौटुंबिक व्यवसायात तुमच्या वडिलांचे मार्गदर्शन मिळाल्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. संध्याकाळी जोडीदारासोबत खरेदीलाही जाऊ शकता.
तूळ : क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास कराल. विवाहयोग्य लोकांकडून विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील.
वृश्चिक : आपले मत स्पष्टपणे मांडाल. मित्रांशी सलोखा वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होण्याची शक्यता. आई-वडील आणि मित्रांकडून साथ न मिळाल्याने तुम्ही उदास राहाल. तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.
धनू : आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील. मनातील कडवटपणा दूर करता येईल. वडिलोपार्जित धनसंपत्तीचा लाभ संभवतो. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित काही वादात तुम्ही अडकू शकता.
मकर : प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. आवडीच्या कामात मन गुंतवावे. आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे बजेट बिघडू शकते.
कुंभ : आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. राजकारणापासून दूर राहावे. अनावश्यक खर्च टाळावा. आजचा दिवस जास्त अनुकूल नसल्यामुळे महत्त्वाची कामे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा.
मीन : कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जवळच्या मित्राजवळ मन मोकळे करावे. तुमचा खर्च आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू शकतो ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल.