मेष : धार्मिक प्रवासाला जाण्याची योजना बनू शकतात, परंतु ती संध्याकाळपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. निराश होण्याची गरज नाही. तुमचे काही चांगले खर्च होतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. उत्तम व्यक्तिमत्व जपाल. नवीन गोष्टीत रस घ्याल. आपला छंद उत्तमरीत्या जपाल. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल.
वृषभ : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस खूप मजबूत असेल. आवश्यक घरगुती कामात मदत मिळेल. रखडलेली कामेही आज पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने कामे पूर्ण होऊ लागतील. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काहीशी गुप्तता बाळगाल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.
मिथुन : व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यकपणे तुम्ही तुमचे शत्रू बनवू शकता, ज्यामुळे तुमची चिंता वाढेल, म्हणून सावधगिरी बाळगा. आज तुमच्या आईला काही समस्या असू शकतात आणि तिच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. मित्रांचा गोतावळा जमवाल. उच्च रहाणीमानाची आवड दर्शवाल.
कर्क : तुमची शक्ती वाढेल. कोर्टाशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल आणि तुमचे मनही प्रसन्न राहील. आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून लाभ मिळेल आणि तुमच्या मनात आनंद राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. आज कोणत्याही चिटफंडमध्ये पैसे गुंतवणे टाळा. दिवस आळसात घालवाल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल. अंगीभूत कलागुण वाढीस लागतील. चैनीकडे कल राहील.
सिंह : तुम्ही विरोधकांवर भारी पडाल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. नोकरीत तुमची स्थिती मजबूत असेल. प्रेम प्रकरणांसाठी आजचा दिवस खूप रोमँटिक असेल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. कलेला पोषक वातावरण लाभेल. आवडीचे साहित्य वाचायला मिळेल. लेखकांना कलागुण विकसित करता येतील. घरात टापटीप ठेवाल. कामाची योग्य पोचपावती मिळेल.
कन्या : तब्येत बिघडू शकते पण व्यवसायात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. आज वाहन जपून चालवा, अन्यथा अपघात होऊ शकतो. लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तीर्थक्षेत्रांनाही भेट देऊ शकता. घरगुती खर्चाकडे लक्ष द्याल. उत्पन्नात वाढ झाल्याने मनामध्ये आनंदाची भावना राहील. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. सासुरवाडीची मदत मिळेल. बौद्धिक कामात गतीमानता येईल. धार्मिक कामात हातभार लावाल. कामाचा दर्जा सुधाराल.
तूळ : आज आपल्याला बौद्धिक सुख मिळेल आणि वैवाहिक जीवन आनंदाने भरले जाईल. मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल आणि कुठेतरी अडकलेले पैसेही परत मिळू शकतील. संध्याकाळी काही शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल. महिलांना उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती करता येईल.
वृश्चिक : तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून पैसा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीबही तुमची साथ देईल, परंतु तुमच्या जवळच्या लोकांशी अनावश्यक वाद होऊ शकतात. कोणाच्या फंदात पडणे टाळा. आज तुमची तब्येत नरम गरम राहू शकते. भागिदारीतून चांगली कमाई होईल. इतरांच्या विश्वासावर खरे उतरावे. योग्य संधीची वाट पहावी. नातेवाईकांकडून मदत मिळेल. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल.
धनू : सासरच्या बाजूने काही फायदेशीर गोष्टी समोर येतील. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखता येईल. मनामध्ये आनंदाची भावना राहील. मुलांसोबत चांगला वेळ जाईल, ज्यामुळे मनाला आनंद मिळेल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहाल. आत्मिक समाधान मिळेल. सारासार विचार करून निर्णय घ्यावा.
मकर : कोणाचाही जास्त विचार न करणे आणि कोणाकडूनही अपेक्षा न ठेवणे चांगले. आज वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, त्यामुळे बिघडलेली कामे होतील आणि नोकरीत चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात आज तुम्हाला काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती गोष्टींमध्ये रमून जाल. क्षुल्लक गोष्टींमधील कटुता टाळण्याचा प्रयत्न कराल. सर्वांशी प्रेमाने वागाल.
कुंभ : आज तुमचा व्यवसाय तुम्हाला प्रचंड नफा देईल आणि देवाच्या विशेष कृपेने आज तुमची अनेक कामे पूर्ण होऊ शकतात. या वेळेचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनातही तणाव कमी होईल. हस्तकलेसाठी वेळ काढा. प्रवासाची हौस भागवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगावा.
मीन : तुम्हाला काही विशेष कामात यश मिळेल. प्रेमप्रकरणात काही वाद होऊ शकतात, त्यामुळे सांभाळून राहा. आज काही खास गोष्टी तुमच्या मनाला त्रास देतील, परंतु कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुम्हाला शांती देईल आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात समाधानी व्हाल. मोठ्या लोकांच्या ओळखीने कामे होतील. आर्थिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न कराल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. मूल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कामातील बदल लक्षात घ्यावेत.