टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताचे एक मेडल नक्की झाले आहे. भारताची बॉक्सर लवलीना बोरगहेन ६९ किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग स्पर्धेच्या सेमी फायमलमध्ये प्रवेश केला आहे. लवलीनानं चीनच्या निएन चिन चेनचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. लवलीनाने निन-चीनवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदक निश्चित केलं आहे.
बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठली की पदकाची खात्री होते. लवलीनाची उपांत्य फेरीत २०१९ च्या विश्वविजेत्या टर्कीच्या अॅना लिसेन्कोशी लढत होईल. लवलीना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे. त्याच्या आधी मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला दोघांमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलीना तिसरी भारतीय आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
आणखी २ बॉक्सर शर्यतीत
भारताच्या सतीश कुमारने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला नमवत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ९१ किलो वजनगटातील बॉक्सिंगमध्ये ४-१ अशा मोठ्या फरकाने सतीशने हा सामना खिशात घातला. पहिला राऊंड ५-० ने जिंकल्यानंतर, सतीशने दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये ४-१ ने विजय मिळवला. आता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचल्यानंतर ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी सतीशला केवळ एक टप्पा ओलांडायचा आहे. भारताची आणखी एक बॉक्सर पूजा राणी देखील पदकापासून फक्त एक विजय दूर आहे.
















