साकळी ता. यावल (प्रतिनिधी) भाजपाच्या केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधात काळे कायदे संमत केले. त्याविरोधात दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशान्वये उद्या दि.३ डिसेंबर २०२० रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार रमेश चौधरी, तालुका अध्यक्ष व गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, हाजी शब्बीर शे, भगतसिंग बापु पाटील, नितिन चौधरी, लिलाधर शेठ चौधरी, शेखर बापु पाटील यांच्या प्रमुख उपस्थितात शेतकी संघ यावल येथे सकाळी १०:०० वा. येथून तहसिल कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, सर्व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कदिर खान, अध्यक्ष काँग्रेस कमिटी यावल शेख रियाज, अध्यक्ष काँग्रेस कमिटी फैजपूर यांनी केले आहे.