TheClearNews.Com
Friday, July 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : गिरीश महाजन यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेला ढीगभर पुरावे दिले : पारस ललवाणी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2020
in गुन्हे, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) ​भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्याचे धागेदोरे जामनेरपर्यंत पोहचले आहेत. माजी मंत्री तथा भाजप आमदार गिरीश महाजन यांनी थेट लाभार्थी दिसू नये म्हणून कार्यकत्र्यांच्या नावावर मालमत्ता घेऊन आपल्या पत्नीच्या नावावर केल्याचा खळबळजनक आरोप माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आज केला आहे. धक्कादायक म्हणजे याबाबत त्यांनी पुणे आर्थीक गुन्हे शाखेला ढीगभर पुरावे दिल्याची माहिती दिली असल्याचेही पत्रकारांना सांगितले. एवढेच नव्हे नव्हे तर, ललवाणी यांनी पुराव्या दाखल काही गटनंबरही देऊन जनतेने ऑनलाईन उतारे तपासून पहावे, असे आवाहनही केले. आज ललवाणी हे जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत बोलत होते.

आज ललवाणी हे जामनेर येथे दाखल झाले असता त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की बीएचआर पतसंस्थे संबंधी माझ्याकडे बरेच पुरावे आहेत .माजी मंत्री व त्यांच्या हस्तकांनी काय काय पराक्रम केले हे मला माहित आहे. ही सर्व माहिती मी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली असून जामनेर शहरातील २० ते २५ कोटी रुपयांची जमीन फक्त एक ते सव्वा कोटी रुपयात आमदार महाजन यांनी घेतली. हे पैसे ही रोक न भरता पावत्या जमा केल्या. शहरातील त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या नावावर ही त्यांनी बीएचआरच्या अनेक जमिनी मातीमोल भावात विकत घेतले आहेत. ​भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था पतसंस्था डबघाईस येऊन अवसायनात गेली. त्यावेळी तत्कालीन मंत्री तथा आमदार गिरीशमहाजन यांनी अवसायक म्हणून मर्जीतील व्यक्त असलेल्या जितेंद्र कंडारेंची नियुक्ती करवून घेतली. एवढेच नव्हे तर संपुर्ण पाच वर्ष त्यांची बदली होऊ दिली नाही.

READ ALSO

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

 

अवसायक कंडारे यांच्या माध्यमातून लिलावाचा देखावा करून सुनील झंवरसह काही मोजक्या कार्यकत्र्यांच्या नावे कवडीमोल दराने मालमत्ता घेतल्या. मालमत्तांच्या लिलावातून आलेली रक्कम ठेवीदारांना परत करणे अपेक्षीत असतांना रक्कम न भरता बहुतांशी ठेवीदारांच्या पावत्या कमीशनवर घेऊन त्यांचा भरणा केला. अशाप्रकारे ठेवीदारांची सोईस्कर पध्दतीने फसवणूक करण्यात आल्याचा आरोप ललवाणी यांनी आमदार महाजन यांच्यावर केला. यावेळी ललवाणी यांनी पुराव्यादाखल जामनेरातील गट क्रमांक २२६ व २२७ ही १८ कोटींची मालमत्ता बीएचआरकडून भंसाली नामक व्यक्तीच्या नावे केवळ तीन कोटीत घेऊन दोन महिण्यांपुर्वी स्वत:सह पत्नी साधना महाजन यांचे नावे पलटवून खळबळजनक आरोप केला. तसेच पुणे येथील ढोले रोडवरील १२५ कोटींची मालमत्ता सुनील झंवर यांचे नावे केवळ १४ कोटीत घेतली,असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आ. महाजन यांच्यावरही ठेवीदार आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ललवाणी यांनी केली.

ललवाणी पुढे म्हणाले की, पुणे गुन्हे शाखेतून मला बोलावणे आलेले नव्हते. मी स्वत:हून पुण्याच्या कार्यालयात गेलो होतो. माझ्याकडे आमदार महाजन यांच्या विरोधात असलेली सविस्तर माहिती ढिगभर पुराव्यानिशी आर्थीक गुन्हे शाखेला दिली. त्यामुळे तपासाअंती आमदार महाजन यांच्यावर निश्चीत गुन्हा दाखल होईल, असा विश्वासही ललवाणी यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. आमदार महाजन धुतल्या तांदळासारखे आहेत तर ते आज रिंगण सोडून पळ का काढत आहेत?. त्यांचे अनेक कार्यकर्ते आज भूमिगत आहेत. जर त्यांनी अपहार केला नाही तर भूमिगत होण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित करून ते शेवटी म्हणाले की या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, पारस ललवाणी यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून आ. महाजनांवर आरोप करण्याची तुमची पात्रता आहे का? असा टोला भाजपाचे तालुका अध्यक्ष चंदकांत बाविस्कर यांनी ललवाणी यांना  लगावला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जुलै 2026 !

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

July 16, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : गिरीश महाजनांना आपले बालक काय उद्योग करताहेत याची माहिती नव्हती - अनिल गोटेंचा थेट आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्याच्या विकासासाठी कटिबद्ध : श्रीराम पाटील !

May 1, 2024

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं” : शिवसेना

July 26, 2021

कुस्तीपटू सुशील कुमारला रेल्वेचा दणका, नोकरीतून केलं निलंबित

May 25, 2021

आमदार मंगेश चव्हाण म्हणजे आमचा कोहिनूर हिरा : ना. गिरिषभाऊ महाजन !

July 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group