यावल (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकूनाला पाचशे रूपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याचे वृत्त समोर येत आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, यावल तहसील कार्यालयातील कोषागार विभागातील अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी याला आज तक्रारदारकडून ५०० रूपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. दरम्यान, अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी याने कोणते काम करण्यासाठी पैसे घेतले याची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे यात आणखी कुणी गुंतले आहेत?, याची देखील चौकशी सुरु आहे. या कारवाईमुळे यावल तालुक्यासह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.