प्रयागराज (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये इफको प्लान्टमध्ये एक मोठा अपघात घडलाय. युरिया तयार करण्यात येणाऱ्या प्लान्टमध्ये रात्री उशिरा अमोनिया गॅस गळती झाली आणि ही मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन अधिकाऱ्यांचा गुदरमरून मृत्यू झाला आहे. प्लान्टचे असिस्टंट मॅनेजर बी. पी. सिंह आणि डेप्युटी मॅनेजर अभिनंदन यांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेश प्रयागराज येथील फूलपुरमधील इंजियन फार्मर्स फर्टिलाइजर कोऑप्ररेटिव्ह लिमिटेड (आयएफसीओ) या कंपनीमध्ये मंगळवारी रात्री मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. कंपनीमध्ये युरियाचे उत्पादन घेणाऱ्या विभागात अमोनिया गॅसची गळती झाल्याने दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर येथे काम करणाऱ्या १५ हून अधिक कर्मचाऱ्यांची तब्बेत बिघडली असून त्यांना उपचारांसाठी शहरातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. गळतीमुळे प्रकृतीवर परिणाम झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक व्ही.पी. सिंह आणि उप व्यवस्थापक अभिनंदन या दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री फूलपुरमधील इफको कंपनीमध्ये अमोनिया आणि यूरिया निर्माण करणाऱ्या दोन्ही विभागांमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरु होतं. रात्री १० वाजता नाईट शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी कंपनीमध्ये होते. साडेअकराच्या सुमारास युरियाचे उत्पादन घेणाऱ्या विभागामध्ये अचानक अमोनिया गॅसची गळती होऊ लगाली. गॅस गळती होत असल्याने एकच कंपनीमध्ये एकच गोंधळ उडाला आणि कर्मचारी सैरावैरा पळू लागले. अनेक कर्मचाऱ्यांनी थेट कंपनीच्या बाहेर जाण्यासाठी पळ काढला. मात्र १५ कर्मचाऱ्यांना वेळेत बाहेर निघता आलं नाही आणि ते अडकून पडले. हे सर्व कर्मचारी बेशुद्ध पडले. नंतर त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गॅस गळतीची घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलीस करत आहे.