चोपडा (प्रतिनिधी) येथील प्रताप विद्या मंदिराच्या उपशिक्षिका जे आर बडगुजर यांनी एनसीसी असोसिएट ऑफिसर पदासाठीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न केले आहे. 16 मे ते 29 जून या 45 दिवसांच्या कालावधीत एनसीसी अधिकारी प्रशिक्षण केंद्र ग्वालियर मध्यप्रदेश येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. एनसीसी अधिकारी बनण्यासाठी खडतर सैनिकी प्रशिक्षण त्यांनी यावेळी प्राप्त केले. महाराष्ट्र बटालियन 49 अंमळनेर तसेच प्रताप विद्या मंदिर चोपडा येथील मुलींसाठीच्या एन सी सी युनिटच्या त्या पहिल्या महिला असोसिएट एनसीसी अधिकारी बनल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कठोर परिश्रम, शिस्त आणि वेळेचे काटेकोरपणे पालन व शारीरिक मेहनत करून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांना TO (ANO) ही रँक प्राप्त झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. 49, महा. बटालियन चे कमानडिंग ऑफिसर कर्नल पिनाकी बनिक तसेच संस्थेचे अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य चंद्रहासभाई गुजराथी ,भूपेंद्रभाई गुजराथी तसेच शाळेचे मुख्याध्यापक पी एस गुजराथी ,उपमुख्याध्यापक पी.डी. पाटील, पर्यवेक्षक एस. एस. पाटील, एम. डब्ल्यू. पाटील, ए.एन. भट, उपप्राचार्य जे.एस. शेलार, समन्वयक गोविंदभाई गुजराथी, उल्हासभाई गुजराथी, डी.टी. महाजन तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी कडून त्यांचे अभिनंदन केले.














