जामनेर (प्रतिनिधी) शहरातील प्रकाशचंद जैन मल्टिस्टेट या पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयावर आज दुपारी धाड पडल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दुपारी एक वाजेच्या सुमारास आलेले पथक साडेचार वाजेला पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देता निघून गेले.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील बजरंगपुरा रोडवरील मल्टिस्टेट प्रकाशचंद जैन या मल्टिस्टेट पतसंस्थेच्या कार्यालयावर आज दुपारी एक वाजेच्या सुमारास एका पथकाची धाड पडली. या पतसंस्थेत सोने खरेदी-विक्रीशी संबंधित संदिग्ध डीडी व्यापाऱ्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच या पतसंस्थेत कोट्यावधीच्या रक्कमेचा व्यवहार हवाल्याच्या माध्यमातून झाल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, या वृत्ताला प्रशासकीय पातळीवर दुजोरा मिळालेला नाहीय. परंतू एका बड्या राजकीय व्यक्तीचा या पतसंस्थेवर वरदहस्त असल्याची कळते. आज एक वाजेच्या सुमारास एक पथकाने पतसंस्थेच्या कार्यालयावर झाडाझडती घेण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. हे पथक ज्या वाहनाने आले त्या वाहनाचा क्रमांक (एमएच १५ जीए ७९३७) होता. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास झाडाझडती संपल्यानंतर हे पथक ज्यावेळी कार्यालयाच्या बाहेर आहे त्यावेळी स्थानिक पत्रकारांना त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. पत्रकारांनी आपण कोणत्या विभागामार्फत आहात फक्त याची तरी किमान माहिती द्या, असे सांगितले.परंतु पथकातील सदस्यांनी त्यावरील कोणतेही उत्तर दिले नाही आणि सरळ वाहनात बसून निघून गेले. याबाबत संबंधित पतसंस्थेने देखिल कुठलाही खुलासा दिलेला नाहीये.
दरम्यान, बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारानंतर जमनेरच्या पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी धाडसत्र झाल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.