पिंप्री खुर्द ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. हॉटेल शीतल पासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना एकूण २०० झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
याचबरोबर संपूर्ण गावात एकूण ४०० ते ५०० झाडांची लागवड करण्याचा संकल्प ग्रामपंचायतीने केला आहे. लवकरच या झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी बोरसे आप्पा यांनी दिली.
या वृक्षारोपण कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी यांच्यासह पत्रकार संतोष पांडे, बाळू चौधरी, धनराज मनोरे, आबा धोबी तसेच अनेक वृक्षप्रेमींनी सहभाग घेतला.