धरणगाव (प्रतिनिधी) १९ जून १९६६ रोजी जन्माला आलेली शिवसेना आज ५५ वर्षाची झाली. त्यामुळे आज पदाधिकार्यांपासून ते सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले बाळकडू ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या हेतुनेचा शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण व अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील व नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहर शिवसेनेने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन शासनाचे सर्व नियम व अटी पाळून केले.
शिवसेना…! नुसते नाव जरी घेतले तरी सर्रकन काटा अंगावर उभा राहतो ती शिवसेना ! कारण यात स्व. प्रबोधनकार ठाकरे पासून तर विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ते सर्व सामान्य शिवसैनिकांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याग आहेच हे विसरून चालणार नाही. १९ जून १९६६ रोजी जन्माला आलेली शिवसेना आज ५५ वर्षाची झाली. हे पाहताना पदाधिकार्यांपासून ते सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत आनंदाचे वातावरण आहे यात दुमत नाही. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धरणगाव शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण व अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला
या आनंदाच्या प्रसंगी धरणगाव शहर शिवसेनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाने व शासनाचे सर्व नियम व अटी पाळून करण्यात आले.
सर्वप्रथम शहरातील सोनवद रोड येथील अमरधाममध्ये डेरेदार वृक्षांची मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव+ वाघ यांच्या हस्ते वटवृक्ष लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, त्याच प्रमाणे सोनवद रोड कडील स्मशान भूमीत तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील अमरधाम येथे सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपणाचा कार्यक्रमानंतर अन्नदानाचा कार्यक्रम हा करण्यात आला, या प्रसंगी जिल्हासहसंपर्क प्रमुख वाघ यांच्या हस्ते गरीब व गरजू लोकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.
या सर्व प्रसंगी उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील, धरणगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेनेचे गटनेते विनय भावे ,उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, संजय चौधरी त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, नंदकिशोर पाटील, जितेंद्र धनगर, भागवत चौधरी, सुरेश महाजन, अहमद पठाण, किरण मराठे, तसेच शिवसैनिक रवींद्र जाधव, मच्छिंद्र पाटील, तोसिफ पटेल, वाल्मीक पाटील, दिलीप पाटील, मोहन महाजन, कमलेश बोरसे, विशाल महाजन, राहुल रोकडे, यशवंत चौधरी, सचिन सोनवणे, गुड्डू पटेल, राजू चौधरी, किरण अग्निहोत्री, ज्ञानेश्वर माळी, गजानन महाजन, चेतन जाधव, सतीश बोरसे, विलास पवार, करण वाघरे, पापा वाघरे, परमेश्वर माळी, संजय धामोडे, छोटू चौधरी, वृक्ष लागवड व त्याचे संगोपन या उपक्रमासाठी भीमा धनगर, गोपाल पाटील, गोपाल चौधरी, योगराज खलाने, अरविंद चौधरी व महेंद्र चौधरी यांनी या कार्यक्रमाची जबाबदारी चोखपणे पार पाडली.
अन्न दाना चा कार्यक्रमासाठी दिपक महाजन व दिपेश सोनार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन नियोजन शिवसैनिकांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीपणे नियोजन केल्याबद्दल लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व शहर प्रमुख राजेद्र महाजन यांनी आभार मानले.