भुसावळ (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस भुसावळच्या शहराध्यक्षा नंदा प्रकाश निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी संगीता राजेंद्र भामरे (जिल्हा महिला राष्ट्रवादी सरचिटणीस), सारिका युवराज पाटील (तालुका अध्यक्षा), रेखा पवन जाधव (तालुका उपाध्यक्षा) आदी व तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.