कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कासोदा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागतर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा अल्पसंख्यांक सचिव शेख मुजम्मिल हुसेन शेख गुलाब, तालुका सचिव शेख निसार शेख, बिस्मिल्लाह महिला अध्यक्षा जुबेदा बी शेख, निजाम भाई, शेख दादा मिया आदी कार्यकर्ते उपस्थित होते.