अमळनेर (प्रतिनिधी) भाजप नेते उदयजी वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने काल पातोंडा भारतीय जनता पार्टी व मित्र परिवारातर्फे स्वर्गीय बापुसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्व.उदयबापु यांना जावून एक वर्ष झाले. स्व.उदयबापु वाघ यांचा २८ नोव्हेंबर २०२० रोजी प्रथम स्मृतीदिन त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली वाहिली गेली. त्या निमित्त जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला. यावेळी मार्गदर्शक विनायक देवाजी बिरारी व भाजपचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमेला वंदन करून पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच किशोर मोरे पाटील, उपसरपंच सोपान लोहार, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील (सह संयोजक भाजप, जळगाव), पांडुरंग लाड (जेष्ठ कार्यकर्ते), मगन सूर्यवंशी (मार्गदर्शक, पातोंडा परिसर विकास मंच), विलास चव्हाण (अध्यक्ष पातोंडा परिसर विकास मंच), राजू वाणी, हेमंत देशमुख, प्रशांत पवार, पद्माकर वाघ, अमित पवार, संदीप निंबाळकर, दिलिप विंचूरकर, दादा पवार, शशी पारधी, हिराकांत पाटील, नितीन पारधी, आनंद कुंभार, समाधान पाटील, स्वप्नील पवार, मंगेश पवार, अविनाश शिंदे, भावेश पाटील, योगेश पाटील(दापोरी), समाधान बोरसे, दीपक बिरारी सह राकेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून बापुसाहेबांच्या आठवणींना उजाळा देऊन स्मृती जागविल्या. तसेच सदर स्मृतिदिनाचे औचित्य साधून पातोंडा परिसर विकास मंच संचलित ध्यानकेंद्र परिसरात वड, बुच, रामफळ, नारळ या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
बापुसाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देऊन त्यांच्या कार्यास आदरांजली वाहण्यात आली. ज्यातून पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी जागरूकतेचे भान जपण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन महेंद्र पाटील व घनश्याम पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोपान लोहार, हिराकांत पाटील, नितीन पारधी, आनंद कुंभार व राकेश यांनी योगदान दिले
















