जामनेर (प्रतिनिधी) ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पिता-पुत्र जागीच ठार झाल्याची घटना तालुक्यातील नेरी येथे आज सकाळी घडली. शेख रशीद शेख कालू (वय ६५) व शेख आबिद शेख रशीद (वय २५) असे मयतांची नावं आहेत.
जामनेर तालुक्यातील वाघरी गावचे पशु व्यापारी शेख रशीद शेख कालू (वय ६५) व त्यांचा मुलगा शेख आबिद शेख रशीद (वय २५) हे नेरी येथे आपली दुचाकी (क्रमांक एम.एच. १९ डी. एल. ४४६५) ने जात होते. याचवेळी ट्रक क्रमांक (जी.जे. १५ यु.यु.१७२६) हा पहूर कडून जळगावकडे जात होता. नेरी गावा जवळील हॉटेल पायल गार्डनजवळ ट्रकसोबत दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दोघेही पिता-पुत्राच्या चाक डोक्यावरून गेल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.