जळगाव (प्रतिनिधी) आगामी काळात झपाट्याने बदलत असलेली सामाजिक,राजकीय व आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून मराठा समाजांच्या तरुणांनी पुढे येवून रणशिंग फुंकले पाहिजे असा सूर सकल मराठा समाज व बुलंद छावा मराठा युवा परिषदेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात उमटला.
मराठा समाजाच्या प्रगती व ज्वलंत प्रश्नांवर उत्तर शोधण्याकरिता मायादेवी नगरातील महाबळ परिसरामधील रोटरी हॉल येथे मराठा समाजाच्या कर्तृत्ववान लोक व तरुणांमध्ये संवाद घडावा या उद्देशाने आज आज शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व समाज घटकांचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी मराठा समाजाची भूमिका राहिली आहे.मात्र, या समाजाला उपेक्षित ठेवण्याचे प्रयत्न अलीकडच्या काही काळात होत असल्याचे दिसून आले आहे. मराठा समाजाचे सर्व प्रश्न व समस्या दूर करण्यासाठी समाजाची सामाजिक,राजकीय व आर्थिक परिस्थिती सुधारून बेरोजगारांच्या हातांना काम दिले पाहिजे. असा विचार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक छावा मराठा युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले.
चर्चासत्रात प्रतिभाताई शिंदे, रोहित निकम, किरण बच्छाव,लीना पवार, राहुल पवार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. डॉ.संभाजी देसाई,कुलभूषण पाटील, निलेश पाटील, नंदूआप्पा पाटील, शंभूअण्णा पाटील, राम पवार, हरीश देशमुख,विनोद देशमुख यांच्यासह मराठा समाजातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मराठा समाजाचे प्रश्न व समस्या यांची निराकरण करण्यासाठी समाजातील नागरिकांनी बुलंद छावा मराठा युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले असून मराठा समाजाच्या समस्या एका छताखाली मांडता याव्यात याकरिता लवकरच येत्या पंधरा दिवसात समाजाचे कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.