धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात वीस रुपयाचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अंगलट करून विनयभंग केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीस अटक केली आहे.
या संदर्भात पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,कडू ऊर्फ देविदास मधुकर नन्नवरे याने दि. २० मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पिडीत मुलीस त्याच्या राहत्या घरी पाणी भरण्याच्या बहाण्याने बोलवले. त्यानंतर तिचे तोंड दाबून मागील रुममध्ये नेत २० रुपयाचे आमिष दाखवत पिडीतेसोबत अंगलट केली. या प्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पुढील तपास सपोनि प्रमोद आर. कठोरे हे करीत आहेत.