नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सर्वात सुरक्षित तुरूंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिहार तुरुंगात (Tihar Jail) पुन्हा एकदा कैद्यांच्या दोन गटांत हिंसक हाणामारी (Fighting) झाली. या हाणामारीत जवळपास १५ कैदी जखमी झाले आहेत.
देशातील सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या दिल्लीतील तिहार तुरुंगात कैद्यांमध्ये पुन्हा एकदा हिंसक संघर्ष सुरू झाला आहे. या हिंसक संघर्षात सुमारे 15 कैदी जखमी झाले. यातील काहींवर अजूनही उपचार सुरू आहेत. कारागृहातील कैद्यांमधील वर्चस्वाच्या लढाईत ही घटना घडली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तिहार प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील हिंसक संघर्षाची ही घटना 2 दिवसांपूर्वी घडली होती. यात कारागृह क्रमांक 8 आणि 9 मधील कैद्यांमध्ये हाणामारी झाली आणि या घटनेत 15 कैदी जखमी झाले आहेत. काही कैद्यांना प्राथमिक उपचारानंतर पुन्हा कारागृहात हलवण्यात आले आहे. तर उर्वरित जखमी कैद्यांवर कारागृहातच उपचार सुरू आहेत. कारागृह प्रशासनाने या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.