मुंबई (वृत्तसंस्था) मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या दोघांचा या हत्येत हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र एटीएसच्या (ATS) पथकाने या दोघांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे देण्यात आला आहे. पण, त्याआधीच मोठी घडामोड घडली आहे. महाराष्ट्र एटीएएसच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं अद्याप समोर आली नाही. मनसुख हिरेन प्रकरणी ATS ने शनिवारी चौकशीला बोलावलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या करता शनिवारी दिवसभर चौकशी सुरू होती आणि त्यानतंर रात्री देखील या दोन व्यक्तींची चौकशी सुरु होती. तर आज सकाळी ९ च्या सुमारास या दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यांना आज ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती ATS ने दिली आहे. या दोघांच्या अटकेमुळे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ उकलले जाणार आहे. त्यामुळे एटीएस पथक काय खुलासा करतो हे पाहण्याचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणाचा पुढील तपास हा एनआयए तपास यंत्रणा करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रायलयाने आता एक आदेश जारी केला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एनआयएने FIR दाखल करावा, असे आदेश दिले आहे. या बद्दल गृहमंत्रालयाने याबद्दल नोटिफिकेशन काढले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.