सोलापूर (वृत्तसंस्था) मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर येथील माळी पाटीजवळ दोन कारची समोरासमोर धडक (Car Accident) झाल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू (six people death) झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमी व्यक्तींना सोलापूरच्या रुग्णायलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर येथील माळी पाटीजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. ही दुर्देवी घटना मोहोळ-पंढरपूर महामार्गावर घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मोहोळ येथील खान कुटुंबातील सदस्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच जखमींनाही पुढील उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या गंभीर घटनेमुळं संपूर्ण परिसर शोकाकुळ झालं आहे.