जळगाव (प्रतिनिधी) शहरात आज दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी गळा आवळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिजाबराव नागो वाणी व नजमा बी सलीम न्हावकर असे मृत व्यक्तींचे नावे असून यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील जानकी नगरातील जिजाबराव नागो वाणी (वय-६२) हे पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरात दरवाजाच्या चौकटीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. कुटुंबियांनी तात्काळ त्यांचा मृतदेह रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मयता घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील नांद्रा बु येथील रहिवासी नजमा बी सलीम न्हावकर (५३) या महिलेने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजेपूर्वी उघडकीस आली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस पाटील नितीन रामदास सोनवणे यांच्या खबरीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना प्रशांत पाटील हे करीत आहे.