वरणगाव (प्रतिनिधी) सावदा येथून दोन मोटरसायकलीवर चार मित्र शिरसाळा मारुती दर्शनासाठी निघाले होते. सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास महामार्गवर मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने मोटरसायकल वरील दोघे मित्रांना जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बोहर्डीजवळील बाबा ढाब्यासमोर शनिवार रोजी सकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयतांमध्ये भास्कर कुंभार व लखन कुंभार (दोघं रा. सावदा) या चुलतभाऊंचा समावेश आहे.
रावेर तालुक्यातील सावदा येथील चार मित्र नित्यनियमाने शनिवारी शिरसाळा मारोती दर्शन जात होते आज शनिवार सकाळी ५ वाजता भूषण किशोर पुर्भी, रा.चांदणी चौक, सावदा तर भूषण चंद्रकांत कुंभार, भास्कर पांडुरंग कुंभार, लखन पंकज कुंभार तीथे रा. इंदिरा गांधी चौक, सावदा हे सकाळी पाच वाजता शिरसाळा ता. बोदवड येथे निघाले सकाळी ६.१५ च्या सुमारास महामार्गावरील बोहर्डी तालुका मुसावळ येथे वाचा ढाच्यासमोर मोटरसायकल होडा ड्रीम युगा क्रमांक एम एच १९. डी एम ८७८९ यावरील चालक भास्कर पांडुरंग कुंभार व त्याच्या पाठीमागे बसलेला लखन पंकज कुंभार यांना अज्ञात ट्रकने मागुन धडक देऊन सुसाट मुक्ताईनगर कड़े निघाले मोठा आवाज झाल्यानंतर भूषण पूर्वे व भूषण चंद्रकात कुंभार यांनी मागे वळून पाहिले असता आपल्या मित्रांच्या गाडीला धडक दिल्याचे लक्षात आले. त्यांनी मागे येऊन बघितले असता भास्कर कुंभार यास जबर मार लागला होता तर लखन याच्या पायाला व छातीला दुखापत झाली बोहडी येथील गावकऱ्यांनी मदत करत होते.
दोघे जखमींना रिक्षातून वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैदयकिय अधिकारी डॉ. क्षितीजा हेडवे यांनी जखमी झालेल्या भास्कर कुंभार मयत झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले तर लखन कुंभार यास तात्काळ भुसावळ रिंद म हॉस्पीटल येथे हलवण्यात आले उपचार सुरू असताना लखनचा देखील मृत्यू झाल्याची बातमी आली भूषण पूर्वीच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रक चालक नाव गाव माहित नाही. यांचे विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष कुमार आडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरिक्षक परशुराम दळवी, पोहे का प्रशांत ठाकुर करीत आहे.
सावदा येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार !
बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारोती मंदिर जागृतस्थान असून शनिवार या दिवशी जळगाव जिल्हयातून भाविक मोठया संख्येने देवदर्श घेण्यासाठी छोटया मोठया वाहनाने जात असतात. मंदिराच्या परिसरात यात्रेचे स्वरूप येते. शनिवार रोजी सावधाचे चौघे मित्र दोन मोटरसायकलवर शिरसाळा मारोतीवर जात असतांना अज्ञात ट्रकचालकाने त्यांच्या मोटरसायकला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. दोघांवर एका वेळी सावदा स्मशान भुमीत अत्यंस्कार करण्यात आले.
दोघे मित्र थोडक्यात बचावले !
आपल्या मागील मित्राच्या दुचाकीच्या अपघाताचा आवाज येताच पुढे जाणाऱ्या भुषण पुर्भी व भूषण चंद्रकांत कुंभार या मित्रांनी त्यांच्याकडे जाण्यासाठी आपली दुचाकी माघारी फिरवली असता ट्रक चालकाने त्यांनाही कट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते थोडक्यात बचावले. यावेळी चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून भरवेगात पोबारा केला.
चारही मित्र एकाच वर्गात !
चारही मित्र शालेय विद्यार्थी असून ते सावदा येथील डि. एन. महाविद्यालयात बीए च्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होते. तर अपघातातील मयत भास्कर कुंभार हा हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे गावातीलच चहाच्या दुकानावर काम करून शिक्षण करीत होता. त्याने देव दर्शनासाठी मालकाची दुचाकी घेतली होती. मात्र, क्रूर काळाने दोन्ही मित्रांवर झडप घातली. या अपघाताची माहीती सावदा येथे कळताच अनेकांनी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.