जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मोबाईल व इतर मदत करणाऱ्या जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे.
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या किरणकुमार बकाले याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याला कारागृहात नेण्यापूर्वी मोबाईल, इअर बर्ड देऊन बोलण्याची सोय करून दिली होती. या प्रकरणी मराठा समाजाने आक्षेप घेत चौकशी व संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी ईश्वर खवले आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहे.