चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील दोन सख्ख्या बहिणींनी पोलीस पाटील पदाला गवसणी घातलीय. यामुळे त्यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गरताड ता.चोपडा येथील निवासी तथा निवृत्त सैनिक मच्छिंद्र पांडुरंग पाटील (हल्ली नेमणूक वायरलेस पोलीस विभाग,जळगाव) यांची जेष्ठ सुकन्या मिताली नरहर पाटील (निम ता.अमळनेर) व लहान सुकन्या मोनिका घनश्याम पाटील (खेडीभोकरी ता.चोपडा) ह्या स्वतःच्या गुणवत्तेने पोलीस पाटीलपदी विराजमान झाल्या आहेत.
गुजर समाजासाठी हि खूपच अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया समाजबांधवांमध्ये व्यक्त होत आहे. दोघं बहिणी उच्च शिक्षित आहेत. या यशात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारे निमकर नरहर धुडकू पाटील सर (माध्यमिक शिक्षक, शारदा माध्यमिक विद्यालय,कळमसरे) तसेच खेडीभोकरी कर घनश्याम डिगंबर पाटील सर,संचालक श्री.समर्थ मॅथ अकॅडमी,चोपडा यांचे पण खूपच योगदान आहे. गावाच्या सेवेसाठी पदप्राती केल्यानंतर परमेश्वर त्यांच्या हातून समाजाची व गोरगरिबांची उत्कृष्ट व आदर्श सेवा घडो अशाच सदिच्छा अनेकांनी दिल्या आहेत. तर आम्ही दोघं बहिणी आता पोलीस पाटील झालोय बरं, असं दोघंही जणी नातेवाईक आणि मैत्रीणींना मोठ्या आनंदाने सांगत आहेत.
















