पारोळा (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील विचखेडे गावाजवळ धुळ्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला सुमारे ५०० फूट कार फेकली गेली अन् चार वेळा उलटली. या दुर्दैवी अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्या जखमीला धुळे येथे घेऊन जात असताना वाटतेतच त्यांचाही मृत्यू झाला. तर इतर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घडली.
पारोळ्याकडून धळ्याकडे जाणारी स्विफ्ट कार (एमएच १९, सीएफ- ११९०) ने धुळे जिल्ह्यातील तरवाडे येथील नीलेश सुरेश पाटील (वय २५), गोविंद भास्कर राठोड (वय २६), राहुल भाऊसाहेब आहिरे (वय २४) या तिघांसह पारोळा तालुक्यातील विचखेड्याजवळ रस्त्यापासून ५०० फूटापर्यंत घसरली कार मोंढाळे प्र.अ. येथील महेश आत्माराम देवरे पाटील (वय २४) हे धुळ्याकडे जात होते. पारोळा शहरापासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या विचखेडा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या या कार चालकाचा ताबा सुटल्याने ही कार रोडच्या कडेला जाऊन ४ वेळा उलटली. त्यानंतर ५०० फुटावर जावून ही कार थांबली.
या दुर्दैवी अपघातात राहुल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. झा तर नीलेश पाटील यांना धुळे येथे उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. तर कारमधील महेश देवरे, गोविंदा वंजारी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना १०८ रुग्णावाहिकेसह महामार्गाची रुग्णवाहिका १०३३ व नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील गोविंदा वंजारी हे गंभीर जखमी असल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला असून पारोळा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.