जळगाव (प्रतिनिधी) पेट्रोल पंपाची दोन लाखांची रोकड घेवून जाणाऱ्या व्यवस्थापकाला मारहाण करीत लुटल्याची घटना घडली होती. रोकड लुटणारे संशयित हे कुसुंबा येथील तरुणांची केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ऋषीकेश रमेश मावळे (साईसीटी सीटी कुसुंबा ) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याचे दोन साथीदार मात्र अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
जामनेर तालुक्यातील शाहपूर येथील निलेश रतन पवार हे एका पेट्रोल पंपावर व्यस्थापक म्हणून नोकरीला आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ते पेट्रोल पंपावरील सर्व पैसे घेवून दुचाकीने घराकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान, जामनेर ते शाहपुर रोडवरील बेल फाट्याजवळ लाल रंगाच्या दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधलेले तीन तरुण आले. त्यांनी निलेश पवार यांच्या दुचाकीसमोर त्यांची दुचाकी आडवी लावून निलेश पवार यांना चापट्ट्टाबुक्यानी मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळील १ लाख ९३ हजार ५०० रुपयांची रोकड असलेली पेट्रोलपंपाच्या हिशोबाचे पैसे घेवून चोरटे तेथून पसार झाले. याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाची कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन अव्हाड, पोउपनिरी दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोना सुधिर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, पोकों राहुल रगडे, विशाल कोळी, ललित नारखेडे, मपोकॉ राजश्री बाविस्कर यांच्या पथकाने केली आहे. तसेच दोन फरार संशयितांचा देखील त्यांच्याकडून शोध घेतला जात आहे.
चौकशी करताच दिली गुन्ह्याची कबुली
गुन्हा दाखल झाल्यानंतर ही जबरी चोरी कुसुंबा येथील तरुणांची केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन अव्हाड यांना मिळाली, गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना संशयितांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने कुसुंबा येथुन ऋषीकेश रमेश मावळे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपणच आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. तसेच गुन्हयातील वापरलेली मोटर सायकल काढून दिली.