भुसावळ (प्रतिनिधी) येथील दुय्यम कारागृहातील तीन कैद्यांसह दोन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, भुसावळ दुय्यम कारागृहातील तीन कैद्यांसह दोन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आज जेल प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर पाचही जणांना भुसावळहून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यातील दोन पोलीस कर्मचारी हे मागील काही दिवसांपूर्वीच जळगाव जिल्ह्यात बदलून आले असल्याचे कळते. दरम्यान, एकाच दिवसात पाच जण कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुली भुसावळ दुय्यम कारागृह प्रशासनाच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.