जळगाव (प्रतिनिधी) शहरातील फुले मार्केट येथे पुजा गारमेंट्स फोडून रोकडसह सामानांची चोरी झाली तर हेमंत किचन वेअर दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची प्रकार शुक्रवारी १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील फुले मार्केट येथे भरत कमल भैरवानी (वय ३९) रा. टी.एम. नगर जळगाव यांचे पुजा गाऊन गारमेंट दुकान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील गल्ल्यातून १५ ते २० हजार रूपयांची रोकड आणि काही साहित्य चोरी झाल्याची घटना शुक्रवारी १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता समोर आली. याच फुले मार्केट मधील चंद्रेश हेमंत शहा (वय ३९) रा. शिवराम नगर यांचे हेमंत किचन वेअर यांचे दुकानाचे दोन कुलूप तोडण्यात आले होते. परंतू शटरचे सेंट्रल लॉक असल्याने दुकान फोडू शकले नाही. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. | यावेळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.