जळगाव (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून एका अद्रक लसून विक्रेत्याची मोटरसायकल लंपास केल्याप्रकरणी एमआयडीसी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अद्रक लसूण विक्रेते मोसिन शहा सलीम शहा (रा. रथ चौक, मनियार मोहल्ला) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्याकडे हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक (एम.एच ४८ ८३०७) ही त्यांना त्यांच्या बहिणीने लसूण अद्रक व्यवसाय करण्यासाठी दिली होती. १५ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मोसिन शहा हे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाड्याने घेतलेल्या दुकानासमोर गाडी लावून लसूण अद्रक विकण्यासाठी निघून गेले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुकानावर परतल्यावर त्यांना मोटरसायकल जागेवर दिसली नाही. यासंदर्भात त्यांनी लहान भाऊसह आजूबाजूच्या लोकांना विचारले. तसेच बाजार समिती परिसरात शोध घेतला. परंतू ती मिळून आली नाही, यासंदर्भात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.