चाळीसगाव (प्रतिनिधी) शेतातून काम करून घराकडे येत असताना बंधाऱ्यावरून बैलांना पाणी पाजण्यासाठी तालुक्यातील सतारा नाल्यात जात असताना आज रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बैलगाडी पलटी होवुन दोघे तरुण पाण्यात पडून जबर जखमी झाले. त्यांनतर त्यांना उपचारासाठी चाळीसगाव येथे आणले असता रस्त्यातच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील सायगाव येथील राकेश चिला माळी (वय २१) हा पिलखोड येथे आय टी आय शिकत होता. आई वडिलांना एकुलता एक असून वडील अंध आहेत तर दुसरा सुकदेव जगन जाधव (वय १७) दोघे आतेभाऊ मामेभाऊ दि. ८ जुलै रोजी शेतात गेले होते शेतातून घराकडे सायगाव येथे बैलगाडी वर येत असताना सायगाव शिवारातील रस्त्यावर असलेल्या सतारी नाला येथे बैलांना पाणी पाजण्यासाठी बंधाऱ्यावरून जात असताना बैलगाडी पलटी होऊन पाण्यात दोघांच्या अंगावर बैलगाडी पडल्याने गाडीखाली दाबून जखमी झाले. यावेळी बाजूलाच मेंढपाळ लोक होते त्यांनी पाहिले असता ते धावत आले. त्यांनी आरडाओरडा करून लोक जमा झाले. त्यांना जखमी अवस्थेत चाळीसगाव येथे रुग्णालयात आणतांना रस्त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे.