सातारा (वृत्तसंस्था) पुण्यातील (Pune) लाल महालात (Lal Mahal) लावणीची कोणत्या अटी शर्तींवर परवानगी देण्यात आली. या वास्तूत कोणत्या हेतूने चित्रीकरण झाले. दोषींवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayan Raje Bhosale) यांनी केली आहे
लाल महल हा नाचण्याच्या चित्रिकरणासाठी नाही. या वास्तूचा व्यावसायिक वापर खपवून घेणार नाही, असा इशारा उदयनराजे यांनी यावेळी दिला. लाल महल ही शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रिकरण करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
लाल महलमध्ये लावणी नृत्याचे शूट झाल्याचा विविध पद्धतीने निषेध व्यक्त होत आहे. आता जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेख घालण्यात आला आहे. पुण्यामध्ये मराठा महसंघातर्फे ज्या ठिकाणी शूट झालं त्या ठिकाणचं शुद्धीकरण करण्यात आले. कार्यकर्त्यांनी इथल्या जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. त्यांनतर सभामंडपात गोमूत्र तसेच गुलाबपाणी शिंपडून हा परिसर शुद्ध केला.
















