मुंबई (वृत्तसंस्था) उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात एवढा अभ्यास केला आहे की ते त्यामुळे ते अर्धे डॉक्टर बनले आहेत. त्यामुळेच कोरोना विषाणू व त्यांच्या आसपासही फिरकला नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल आहे.
राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची आणि कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांचा कोरोनावर इतका अभ्यास झाला आहे की कोरोना त्यांना झालाच नाही आम्हाला सगळ्यांना झाला अस अजित पवार म्हणाले. गंमतीचा भाग सोडा पण आपण कोरोना काळात असूनही खूप चांगलं काम केलं आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खूप चांगली वाटचाल करत आहेत. आपलं सरकार पडणार, तीन महिन्यात कोसळणार, सहा महिन्यात कोसळणार हे विरोधक म्हणत राहिले पण त्यांना हे सरकार पाडण्यात यश आलं नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केला. आता पुढची चार वर्षे महाविकास आघाडी सरकार हे यशस्वी आणि दमदार वाटचाल करेल यात माझ्या मनात काहीही शंका नाही. आपण एकजुटीने काम करतो आहोत यापुढेही आपल्याला असंच काम करायचं आहे. गेल्या वर्षभरात अनेक अडचणी आल्या. तरीही लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.