मेष : सामाजिक क्षेत्रात सन्मान वाढेल. मित्रांसोबत शुभ कार्यात जाल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. तुम्ही आपल्या मतांवर ठाम असणार आहात. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना अनुभवण्यास मिळेल. आज व्यवसायात लाभ झाल्याने तुम्ही समाधानी असाल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे आज आपण विनासायास पूर्ण करू शकणार आहात.
वृषभ : निष्काळजीपणा करु नका, मोठे नुकसान होऊ शकते. कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान कराल. आज आपल्याला काही अनावश्यक कामे करावी लागणार आहेत व त्यामुळे आपली चिडचिड होणार आहे. मानसिक उद्विग्नता शांतता लाभू देणार नाही. आज तुम्हाला व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी.
मिथुन : व्यवसायत नवीन काही करण्याची संधी मिळेल. आज वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मित्र-मैत्रिणीबरोबर आजचा दिवस आपण आनंदीपणाने व्यतित करू शकणार आहात. जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकणार आहात. आज तुम्हाला यश मिळेल. तुमच्या आवडीचे काम जबाबदीने कराल. आर्थिक कामास आजचा दिवस विशेष आपणाला अनुकूल असणार आहे.
कर्क : शत्रूपासून सावध राहा. तुम्हाला कामात आळस सोडवा लागेल, अन्यथा नुकसान होईल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज तुम्ही काही पैसे खर्च कराल. नवीन कामामुळे आनंदी राहाल. आज आपल्याला कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
सिंह : अध्यात्माकडे लक्ष दिल्याने मन:शांती मिळेल. इतरांना मदत करा. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल. मनोबल उत्तम राहील. आज तुम्ही कामात खूप व्यस्त असाल. प्रवासाकरिता आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे.
कन्या : कुटुंबातील सदस्यांशी वाद होतील. बोलताना जपून बोला. नात्यात दरी येईल. इच्छुकांचे लग्न जुळेल. मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामात काही अडचणी राहणार आहेत. आज आपण शांत व संयमी राहावे. प्रतिकूलतेचा सामना करावा. आज कोणत्याही कामात घाई करु नका. तुमचे काम बिघडू शकते. अकारण होणाऱ्या वादविवादास टाळण्याचा प्रयत्न करावा.
तुळ : मालमत्तेतील वाद सुटतील. कामात भरघोस यश मिळेल. कुटुंबात पार्टीचे आयोजन केले जाील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आज तुम्ही कोणतेही नवीन काम सुरु केले तर लाभ होऊ शकतो. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
वृश्चिक : कुटुंबातील कलह थांबू शकतो. मुलांच्या शिक्षणाबाबत निर्णय घ्याल. विरोधक व हितशत्रुंवर मात करणार आहात. तुमच्या मनावर अनावश्यक दडपण राहील. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नये. अतिताण घेऊ नये. आज व्यवसायात प्रगतीचा मार्ग मिळेल. बँकेकडून कर्ज मिळू शकते. प्रवासात विशेष काळजी घ्यावी.
धनु : मेहनतीचे फळ मिळेल. तुम्ही आनंदी असाल. पैशांची व्यवस्था करावी लागेल. मुला-मुलींच्या सौख्याकरिता प्रयत्नशील राहाल. आरोग्य उत्तम राहील. आज कोणावरही विश्वास ठेवू नका. मित्र शत्रूत्व स्विकारतील. लग्नाचा प्रस्ताव घरच्याकडून मंजूर होईल. नोकरदार लोकांची चिंता वाढेल. आज पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्यास फायदा होईल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस विशेष अनुकूल असणार आहे. मनोबल उत्तम असणार आहे.
मकर : आरोग्यापासून व्यवसायापर्यंत सर्व काम काळजीपूर्वक करा. खाण्याच्या सवयींमध्ये भावाचा सल्ला घ्या. उत्साहाने कार्यरत राहून आज आपण अनेक कामे मार्गी लावणार आहात. तुमचे आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक कार्यात मान-सन्मान लाभेल. आजच्या दिवशी सावध राहावे लागेल. प्रतिष्ठा वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : म्हाला फायदेशीर परिणाम मिळतील. स्वत:च्या बुद्धीमत्तेचा वापर करुन काम करावे लागेल.काहींना आज गुरुकृपा लाभणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. भाग्यकारक अनुभव येतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर जोखीम पत्करावी लागेल. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे.
मीन: स्वत:च्या बुद्धीमत्तेचा वापर करुन काम करावे लागेल. इतरांचा सल्ला घेणार नाही. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. व्यवसायातील जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. तुमचे आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. मित्राच्या मदतीने पुढे याल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभेल.