धरणगाव प्रतिनिधी – तालुका प्रवासी मंडळातर्फे धरणगाव रेल्वे स्थानकावर दि. ४ जुलै शुक्रवार रोजी उधना – पंढरपूर वारकरी स्पेशल रेल्वे चे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या हस्ते ट्रेन चे लोको पायलट यांचा सत्कार करून मिठाई बॉक्स देण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून माजी जि. प.सदस्य प्रतापराव पाटील , प्रमुख अतिथी भैरवीताई पलांडे (वाघ), भा. ज. पा. जिल्हा उपाध्यक्ष ऍड. संजय महाजन ,भा. ज. पा. जेष्ठ नेते शिरीष बयस, भा. ज. पा. धरणगाव मंडळ अध्यक्ष दिनेश नीलकंठ पाटील पाळधी मंडळ अध्यक्ष किशोर झवर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डि.ओ.पाटील,मा. गटनेता कैलास माळी सर, संतकृपा वारकरी शिक्षण संस्थेचे ह. भ. प. नाना महाराज आदी उपस्थित होते. पंढरपूर चे प्रवासी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,संस्थेचे सदस्य राजेंद्र पडोळं सर यांनी सूत्र संचलन केले. सहसचिव किरण वाणी यांनी प्रास्ताविक केले तसेच प्रतापराव पाटील, भैरवीताई पलांडे, अँड संजय महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. ऍड. हर्षल चव्हाण यांनी आभार मानले. धरणगावातील प्रतिष्टीत नागरिक बालकवी ठोंबरे शाळेचे चेअरमन कान्हाशेठ भाटिया, मा. नगरसेवक गुलाब मराठे, हेडगेवार नगरचे उप सरपंच चंदन पाटील, श्री बालाजी पतसंस्थेचे मँनेजर राजेंद्र महाजन, माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे जितू महाराज, ज्ञानाई शिक्षण संस्थेचे हिरालाल महाराज, विजय महाजन, संजय चौधरी, जितेश महाजन, धीरेंद्र पुरभे तथा पंढरपूर चे प्रवासी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष महेंद्र कोठारी यांनी ६ वर्ष जुनी मांगणी ताप्ती सेक्शन साठी पुणे गाडी सुरु करण्यात यावी
ताप्ती गंगा एक्सप्रेस, अहमदाबाद बरोनी एक्स. ला धरणगाव साठी थांबा देण्यात यावा . सुरत अमरावती एक्स. डेली करण्यात यावी याचा पाठपुरावा करण्यात सांगितले. हा कार्यक्रम यशस्वीते साठी उपाध्यक्ष रवींद्र भागवत, सचिव एस. डब्लू. पाटील सर, हितेश पटेल, आनंद वाजपेयी, डॉ मिलिंद डहाळे, किरण सिंह परिहार, दिनकर पाटील, ललित येवले, सुनील चौधरी ,सुशील कोठारी, सुरेश कासार, संतोष सोनवणे, सुदाम चौधरी , डॉ स्वप्नील पाटील, डॉ पंकज अमृतकर, राजेश मकवाने, सुदाम चौधरी यांनी केले.