मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. पण नुसती माफी मागून चालणार नाही. तर तुमच्या चुकीमुळे ७०० कुटुंबांना नुकसान भोगावं लागत आहे. त्यामुळे त्यांना पीएम केअर फंडातून तातडीने आर्थिक मदत करा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी देशभरातून मागणी होत आहे. कारण गेल्या दीड वर्षामध्ये ७००च्या आसपास शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व तीन कृषी कायद्यांच्या विरोधात लढत होते. पंतप्रधानांनी हे कायदे मागे घेतले. सरकारला आपली चूक समजली पण या चुकीच्या निर्णयाचे बळी शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचे कुटुंबिय उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आणि पंतप्रधानांनी त्यांना मदत करावी यात चूकीचे काही नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. देशाची आणि शेतकऱ्यांची माफी मागून चालणार नाही. त्यासाठी मदत करा. तुम्ही जी चुकी केली त्याचं नुकसान ७०० कुटुंबांना भोगावा लागत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्याची तब्येत सुधारत आहे. त्यांच्याशी काल रात्री बोलणं झालं. लवकरच ते घरी जातील. त्यांनी संपूर्ण बरे होऊन कामाला लागवं. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कामाला सुरुवात करावी, असं राऊत यांनी सांगितलं.