नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुलीने प्रेम विवाहा केल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून हत्या केल्याची भयंकर घटना उघड झाली आहे. हरियाणातील सोनीपतमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, मुकीमपूर येथील रहिवासी असलेल्या तरुणीने २०२० मध्ये शेजारीच राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. यांच्या लग्नाला विरोध असल्यामुळे यांनी पळून जाऊन लग्न केले होते. हा राग मुलीच्या वडीलांना होता. दरम्यान वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने मुलीला व तिच्या पती वेदप्रकाशला घरी बोलावून घेण्यात आले.
जुन्या गोष्टी विसरून दोघांनाही परत येण्यास सांगण्यात आलं. यानंतर दोघंही कुटुंबीयांसोबत फोनवर बोलू लागले. मुलीचे वडील विजयपाल यांनी सहा जुलै रोजी आपल्या मुलीला फोन केला आणि म्हणाले की सात जुलैला त्यांचा वाढदिवस आहे. तुम्ही दोघंही वाढदिवस साजरा करण्यासाठी घरी या. दोघंही विजयपालच्या जाळ्यात अडकले आणि आपल्या वडिलांना फोन करत आपण राई ठाण्याच्या समोर उभं असल्याचे तरुणीने सांगितले. यानंतर दोघंही कुटुंबीयांसोबत फोनवर बोलू लागले.
वेदप्रकाशला संशय आला आणि त्यानं पोलिसांना याबाबत माहिती दिली. २० जुलै रोजी वेदप्रकाश पुन्हा पोलीस ठाण्यात गेला आणि आपल्या पत्नीच्या हत्येची आणि अपहरणाची शंका त्यानं बोलून दाखवली. यानंतर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. तक्रारीनंतर पोलिसांनी कसून चौकशी करताच मुलीच्या वडिलांनी सांगितलं की सहा जुलै रोजीच ठाण्याच्या समोरून घेऊन जात मुलीची हत्या केली आणि तिचा मृतदेह मेरठजवळील एका कालव्यात फेकून दिला.