नागपूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील बुटीबोरीतील वेणा नदीच्या पुलावर बुधवारी रात्री भीषण अपघात घडला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात तिघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. दुसऱ्या एका अपघातात एका कामगाराचाही मृत्यू झाला.
बुटीबोरीतील वेणा नदीच्या पुलावर क्र (एम.एच. ४० सीएल – ९९१९) आणि (एम.एच.-४० एएस-५८७१) या दोन्ही दुचाकी बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येत एकमेकाला सामोरा समोर धडकल्या. यात सुकळी येथे जात असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यात वडील शंकर बिसेन (३७), त्यांची पत्नी सरिता बिसेन (३२) आणि मुलगा हिमांशू बिसेन (१४) यांचा समावेश आहे.