धरणगाव (प्रतिनिधी) ट्रक चालकाच्या बेपर्वाईमुळे पारोळा तालुक्यातील तामसवाडी गावातील क्लीनरचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली होती. याला जबाबदार असलेल्या ट्रक चालकाविरोधात सोमवार, 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र मश्चिंद्र पवार (43, तामसवाडी, ता.पारोळा) असे मयत क्लिनरचे नाव आहे.
पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथे जितेंद्र पवार हा आपल्या परीरवारासह वास्तव्याला होता व ट्रक क्रमांक (एम.एच.18 व्ही.जी.9555) वर क्लिनर म्हणून कामाला होता. त्याच्यासोबत चालक सिया सारण शाहू (मोहाडी. ता.जि.धुळे) कामाला होता. शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास जितेंद्र हा चालक सिया शाहूसोबत ट्रकवर असताना दोघे ट्रकने धरणगाव तालुक्यातील रेल येथे कामानिमित्त आले.
गावाच्या बाहेर ट्रकची हवा भरण्यासाठी जितेंद्र पवार हा खाली उतरला असता पुढच्या चाकात हवा भरत असतांना ट्रकवरील चालकाने कोणतीही खात्री न करता ट्रक जोरात मागे पुढे केल्याने जितेंद्रच्या पायावरून ट्रक केल्याने गंभीर जखमी होवून त्याचा दुदैवी मृत्यू झाला. मयत जितेंद्र पवार यांचे वडील मश्चिंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवार , 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता धरणगाव पोलिसात ट्रक चालक सिया शाहू याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गजानन महाजन करीत आहे.
















