मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील नायगाव येथील तरुणाचा तापी नदी काठावरील वीज पंपाचा शॉक लागून जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घटना दि. ८ रोजी घडली होती. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात एकाविरुद्ध दाखल करण्यात आला.
शामराव रामा मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा भाचा विजय उर्फ सोनू मराठे हा तापी नदीवरील वीज पंच सुरू करण्यासाठी गेला होता. तो दुपारपर्यंत घरी परत न आल्यामुळे नदी काठावर जाऊन पाहिले असता त्यात विजय हा मोटारीचा शॉक लागून पडलेला दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्याने काही नागरिक, पोलिस पाटील, सरपंच हे घटनास्थळी आले. त्यानंतर पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली.
दरम्यान, त्या ठिकाणी बसवलेली मोटर ही रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या मालकीची होती. तसेच त्यात करंट असल्याबाबत त्यांना माहिती दिली होती. पण त्यांनी हलगर्जी केल्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ऑन पुढील तपास उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे करत आहेत.