मुंबई (वृत्तसंस्था) नागपुरातील कोविड रुग्णालामध्ये भीषण आग लागली होती. या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शहरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाच्या दुसर्या मजल्यावर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
काल रात्री ८.१० वाजता लागलेल्या आगीत काही लोक जखमी झाल्याचेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या रुग्णालयातून सुमारे २७ रुग्णांना दुसर्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. यावेळी काही सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आगीनंतर रुग्णालय खाली करण्या येत आहे. नागपूरचे वैद्यकीय अधीक्षक अविनाश यांनी सांगितले की, रुग्णालयात तीन मृतदेह मिळाले आहेत. मदत कार्य चालू आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी, नागपूर महानगरपालिकेचे (एनएमसी) मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या दुसर्या मजल्यावरील आयसीयू जवळील एसी युनिटमध्ये आग लागली. कालांतराने आगीवर नियंत्रण मिळवले. दुसर्या मजल्यावर आग पसरु दिलेली नाही.
पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्टिट केले आहे, ‘नागपूर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे मी दु: खी आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांबद्दल माझ्या संवेदना आहेत. या घटनेत जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. ‘
नितीन राऊतांकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, नागपुरातील कोरोना रुग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. याप्रकरणाची संबंधित विभागातर्फे चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच या रुग्णालयातील विद्युत कनेक्शन बरोबर होते की नाही, याचीही चौकशी केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.
अनेक रुग्णांना आगीत होरपळावं लागतं ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. यातील एका रुग्णांचा आधीच मृत्यू झाला होता. तर इतर दोघांचा दुसरीकडे शिफ्ट करताना मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.