लखनऊ (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशातल्या इंदूरची ही घटना आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे. स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकीनं गोध्रा हत्याकांडावरून अमित शाहांवर टिका टिप्पणी केली तसं हिंद रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला अडवलं. आणि थेट पोलीस ठाण्यात नेलं. ही घटना इंदूरच्या मुनरो कॅफेत घडली.
कॉमेडियन मुनव्वर फारूकी हा सिरियल ऑफेंडर असल्याचा आरोप हिंद रक्षक दलानं केलाय. यापुर्वीही त्याने हिंदू देवी देवता आणि अमित शाहांवर खालच्या भाषेत टिका केल्याचा आरोप आहे. एवढच नाही तर गोध्रा जळीतकांडात मारले गेलेल्या कारसेवकांवरही त्यानं टिप्पणी केल्याचा आरोप हिंद रक्षक दलानं लावलाय. कॉमेडियन मुनव्वर फारूकीचा कार्यक्रम जाहीर होताच हिंद रक्षक दलाच्या काही कार्यकर्त्यांनी त्याचे तिकिट विकत घेतले आणि कार्यक्रमात प्रवेश केला. मुनव्वर फारूकीनं गोध्रा हत्याकांडावरून अमित शाहांवर टिका टिप्पणी केली तसं हिंद रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला अडवलं. आणि थेट पोलीस ठाण्यात नेलं. लोकांच्या भावना भडकवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलाय.
एर्नाकुलममध्येही हलालच्या स्टीकरवर वाद झालाय. हिंदू ऐक्य वेदी संघटनेनं एका हलालचं स्टीकर लावणाऱ्या बेकरीवाल्याला ते हटवायला भाग पाडलं. यात चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय.
















