TheClearNews.Com
Tuesday, December 16, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात ‘ईद पाडवा’चा अनोखा सोहळा; सामाजिक एकता आणि देशभक्तीचा जागर

शनिपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, रॉक ऑन ग्रुप, युथ फॉर हेल्प फाउंडेशनतर्फे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
April 2, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गुढी पाडवा आणि ईद या दोन पवित्र सणांच्या निमित्ताने जळगाव शहरात सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा ‘ईद पाडवा’ हा अनोखा सोहळा उत्साहात साजरा झाला. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सणांचा आनंद साजरा करत परस्पर सौहार्द आणि शांततेचा संदेश दिला. कट्टर हिंदूत्व, कट्टर इस्लाम मनात बाळगताना कट्टर देशभक्ती देखील असावी, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले.

गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि ईद हा मुस्लिम बांधवांचा आनंदाचा सण एकाच वेळी साजरा करून जळगावकरांनी सामाजिक एकतेचा अनोखा दृष्टांत घडवला. शनिपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, रॉक ऑन ग्रुप आणि युथ फॉर हेल्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

READ ALSO

मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बळीराम पेठेतील ओक मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्याला पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ.करीम सालार, मुफ्ती हारून नदवी, राष्ट्रवादीचे एजाज मलिक, सोहेल अमीर, डॉ.विवेक जोशी, माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, अँड.पियुष पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, मानसिंग सोनवणे, डॉ.रागीब अहमद, माजी नगरसेवक जाकीर पठाण, अश्फाक मिर्झा, अयाज अली, अमजद पठाण, निलेश तायडे, शाहिद शेख, संजय वराडे, युवराज सोनवणे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

चेतन वाणी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, या सोहळ्याला आपण एकत्र येऊन सण साजरे करूया आणि आपल्या शहरातील बंधुभाव वृद्धिंगत करूया. हा उपक्रम म्हणजे आपल्या एकतेची ताकद आहे. गेल्या ८ वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असून परिसरात सामाजिक एकोपा आणि बंधुभाव जोपासला जात असल्याचे त्यांनी सांगितले. आभार व्यक्त करताना वसीम खान म्हणाले की, ईद आणि गुढी पाडवा यांचा संगम आपल्या संस्कृतीच्या वैविध्याचा पुरावा आहे. सर्वांनी या आनंदात सहभागी होऊन एकतेचा संदेश दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले.

युवकांनी कट्टर देशभक्ती अंगीकारावी : पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, जाती-धर्मात तेढ निर्माण न करता सर्वांनी गुण्यागोविंदाने राहून सामाजिक शांतता अबाधित ठेवावी. युवकांनी कट्टर देशभक्ती अंगीकारून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे. प्रत्येकाने आपल्या धर्म, जातीचा अभिमान बाळगताना दुसऱ्याचा अपमान होईल असे कृत्य करू नये. अगोदर बॅनर, पोस्टरमुळे वाद व्हायचे आता सोशल मीडियामुळे होतात. एकाने काही पोस्ट केली तर दुसरा त्याला उत्तर देतो आणि त्यातून वाद वाढतो. विशेषतः १५ ते २५ वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यांचे समुपदेशन करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

मान्यवरांचे प्रेरक विचार, तरुणाईला दिला सल्ला
पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित म्हणाले, हा सोहळा समाजाला एकसंध ठेवण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. अशा उपक्रमांमुळे शांतता आणि सलोखा वाढतो. आपण सर्व एकत्र राहिलो तर दृष्ट प्रवृत्ती आपल्यात तेढ निर्माण करू शकत नाही. युवकांना आपल्याला शिक्षण देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ.करीम सालार यांनी, हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन समाजासाठी आणि देशासाठी कार्य करावे. उपवास प्रत्येक धर्मात असून ते आपल्याला स्वतःच्या मनावर ताबा आणि विचारांचा संयम कसा ठेवावा हे शिकवतात असे मत मांडले.

ईद पाडवा समाजाला जोडून ठेवतो
मुफ्ती हारून नदवी यांनी, सण हे एकतेचे प्रतीक आहेत, त्यातून आपण शांततेचा संदेश द्यायला हवा. राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण करतात मात्र आपण शांत रहावे असे सांगितले. सोहेल अमीर यांनी, तरुणांना देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून देत एखाद्या ठिकाणी कॅमेरा लावलेला असल्यास काही गैरकृत्य करताना आपण घाबरतो तसेच आपल्यावर ईश्वर, अल्लाह लक्ष ठेवून आहे असे ठरवल्यास काहीही चुकीचे आपल्या हातून घडणार नाही असे त्यांनी सांगितले. एजाज मलिक यांनी कार्यक्रमाचे फार सुंदर वर्णन करीत आजवर परिसरात स्व.गफ्फार मलिक यांनी मित्रत्व जोपासत शांतता टिकवून ठेवल्याचे सांगितले. डॉ.रागीब अहमद, अजीज सालार, अँड.पियुष पाटील यांनीही एकता आणि शांततेच्या मूल्यांवर भर देत उपस्थितांचे कौतुक केले. तसेच रक्तदान हे श्रेष्ठदान असून तिथे कधीच जात, धर्माचे लेबल लागत नाही, असे सांगितले.

शिरखुर्मा, फराळचा घेतला आस्वाद
या सोहळ्यात गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे स्वागत आणि ईदच्या शुभेच्छा देऊन आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपात उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी शीरखुर्मा, फराळचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यामुळे सणांचा आनंद आणि एकतेचा सुंदर मिलाफ पहायला मिळाला.

यांनी घेतले परिश्रम
सोहळा यशस्वी करण्यासाठी शनिपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रॉक ऑन ग्रुप आणि युथ फॉर हेल्प फाऊंडेशनचे चेतन वाणी, वसीम खान, इमरान खान, अझर खान, हरीश मलीक, फिरोज शेख, फहीम खान, जावेद शेख, इस्माईल खान, इसरार खान, शोएब शेख, नझर खान, तस्लिम सय्यद, जकी अहमद, रिजवान सैय्यद, वसीम शेख, अयाज मोहसीन, आनंद गोरे, बबलू खान, रहीम पेंटर, चंदन मोरे, राकेश वाणी, मोहन कासार आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुलाच्या लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

December 16, 2025
जळगाव

गाव सक्षम झाले तरच महाराष्ट्र सक्षम होतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 16, 2025
गुन्हे

वादानंतर चार तासातच अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

December 16, 2025
सामाजिक

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 16 डिसेंबर 2025 !

December 16, 2025
जळगाव

शिवसेना शिंदे गटाने फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग !

December 15, 2025
गुन्हे

विटांच्या ट्रॅक्टरच्या नावाखाली ५० हजारांची लूट !

December 15, 2025
Next Post

Today's Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 03 एप्रिल 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : पतीसमोरच पत्नीवर सामुहिक बलात्कार !

September 10, 2021

जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री कायदेशीर : अजित पवार

July 2, 2021

बरे होणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या पुन्हा जास्त ; आज आढळले ६४ कोरोनाबाधित !

November 22, 2020

अमेरिकेत ‘एफडीए’च्या अंतर्गत मॉडर्नाच्या लशीला मंजुरी

December 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group