अहमदनगर (वृत्तसंस्था) शिक्षक (Teacher) असलेल्या पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक अत्याचार (unnatural abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात शिक्षक पतीवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पीडित पत्नीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी या सध्या अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहतात. त्या एका खासगी रूग्णालयात नोकरी करत आहे. जामखेड तालुक्यातील एका शिक्षकासोबत त्यांची ओळख होती. ओळखीतून त्यांनी ता. १८ जुलै २०१८ रोजी लग्न केले होते. लग्नानंतर तो शिक्षक पती फिर्यादी यांना त्रास देत असल्याने त्या जामखेड सोडून अहमदनगर शहरात राहण्यासाठी आल्या होत्या. त्या शिक्षकाने त्यांचा पत्ता शोधून त्या राहत असलेल्या अहमदनगर शहरातील त्यांच्या घरी ये-जा वाढविली. ता.१८ जानेवारी २०२२ रोजी शिक्षक पतीने तिच्या घरी येत तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. झालेल्या घटनेमुळे घाबरलेल्या पीडिताने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरून तोफखाना पोलिसांनी पीडितेचा पतीविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.