अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात आदर्शगाव जवखेडा येथे लताबाई हिम्मतराव पाटील यांची सरपंचपदी तर चुडामण प्रकाश पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश खैरनार यांनी काम पाहिले.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी श्यामकांत पाटील, लटकन पाटील, प्रभाकर पाटील, सुरेश पाटील, नितीन पाटील, हंसराज पाटील, नगराज पाटील यांचे सहकार्य लाभले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य जीजाबराव पाटील, प्रशांत पाटील, दिनकर पाटील, चारुशीला पाटील, जयश्री माळी, अर्चना पाटील, सरजाबाई पाटील, जिजाबराव भिल हजर होते. निवडणूककामी ग्रामसेवक दिलीप मोरे व तलाठी दाभाडे यांचे सहकार्य लाभले.