चोपडा (प्रतिनिधी) येथील व्यापारी महामंडळाची अनिल वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली तर संजय कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत आगामी तीन वर्षांसाठी कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
अशी आहे कार्यकारणी !
अध्यक्ष अमृतराज सचदेव, कार्यकारी अध्यक्ष सुनील बरडिया, प्रमुख मार्गदर्शक अनिल वानखेडे, संजय कानडे, जीवन चौधरी, भूपेंद्र गुजराथी, सुनील बुरड, संजय श्रावगी, उपाध्यक्ष -दिपक राखेचा, नरेंद्र तोतला,शाम सोनार,प्रफुल्ल स्वामी, उमेश कासट, कायदेशीर सल्लागार अॅड. धर्मेंद्र सोनार, सचिव प्रविण राखेचा, सहसचिव विपीन जैन, तर जवळपास 74 व्यापाऱ्याची संचालक म्हणून निवड बिनविरोध झाली असून प्रसिद्ध प्रमुख म्हणून प्रवीण पाटील, लतीश जैन, मिलिंद सोनवणे आदींची एकमुखाने निवड झाली आहे. यावेळी अनेक व्यापारी हजर होते नवीन निवड झालेल्या व्यापारी बंधुचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माझ्यासाठी मोठी अभिमानाची बाब : अमृतराज सचदेव !
नुतन अध्यक्ष अमृतराज सचदेव म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून मी ही जबाबदारी व्यवस्थित आपल्या सर्वांच्या सहकार्य मुळे सांभाळत आलो आहे. आता ह्या जबाबदारीतुन मला मुक्त करावे असे मी सुचविले होते. परंतु आगामी तीन वर्षांसाठी अजून सर्व व्यापाऱ्यानी माझ्यावर भार टाकला आहे. तो मी तुमच्या सहकार्यमुळे समर्थ पणे सांभाळेल असे आश्वासन देतो आणि आपल्याच सहकार्याने सर्वांना माझ्याने होईल तितकी मदत करण्याचे प्रयत्न करीन, असे आश्वासन त्यांनी दिले. व्यापारी महामंडळात सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे लोक असून देखील चोपड्यात व्यापाऱ्यांचा एकोपा आणि एकमेकांना मदत करण्याची भूमिका असल्यानेच माझ्या सारख्या छोट्या व्यक्तीला आपण जवळपास २५ वर्षांपासून अध्यक्ष म्हणून राहू देत आहे, हे माझ्यासाठी मोठी अभिमानाची बाब असल्याचेही सचदेव म्हणालेत.