कासोदा ता, एरंडोल( प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कासोदा ग्रामपंचायत ओळखली जाते. ग्रामपंचायतीची निवडणूकीसाठी वार्ड नंबर ४ मध्ये जनरल जागेसाठी नाजीमअली हाजी अहमद अली यांच्याविरोधात इश्तियाक खान महेमुदखान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज माघारीच्या दिवस असल्याने इश्तियाकखान मेहमूदखान यांनी माघार घेतल्याने ही जागा बिनविरोध झाली आहे. नाजीमअली हे बिनविरोध निवडून आले आहे.
परंतु निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी जाहीर करतील त्यांचीही निवडून येण्याची तिसरी वेळ आहे. त्यांनी हॅट्रिक केली आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मौलाना आझाद विचार मंचचे जिल्हा संघटक नूरुद्दीन मुल्लाजी, कासोदा शहराध्यक्ष आरिफ पेंटर, सदस्य हमजेखान, अहमदखान ट्रॅक्टर वाले, शब्बीर पठाण शेख, निसार हाजी शेख, मुसा मुजफ्फर अली माजी ग्रामपंचायत उपसरपंच अहेसानअली यांनी अभिनंदन केले आहे.