फैजपूर (प्रतिनिधी) वार्ता फाउंडेशन या नोंदणीकृत पत्रकार संघटनेची कार्यकारिणीची सभा कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात घेण्यात आली. यावेळी बिनविरोध सर्वानुमते फैजपुर शहर अध्यक्षपदी उमाकांत पाटील तर खजिनदार अरूण होले तर सचिव संजय सराफ यांची नियुक्ती करण्यात आली.
माजी शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी शहराध्यक्ष पदाचा पदभार उमाकांत पाटील यांच्याकडे सोपवला. नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष प्रा. उमाकांत पाटील, उपाध्यक्ष सलीम पिंजारी, उपाध्यक्ष मयूर मेढे, सचिव संजय सराफ, सहसचिव राजेंद्र तायडे, खजिनदार अरूण होले, कार्याध्यक्ष वासुदेव सरोदे, सदस्य सन्माननीय पत्रकार राजू तडवी, इदू पिंजारी, योगेश सोनवणे, शाकीर मलिक, जावेद काझी, कामिल शेख, निलेश पाटील. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून अभिनंदन केले.