जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन आणि जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थांच्या सुरू असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे फक्त संजय पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याकारणाने दोन्ही संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय मुरलीधर पवार यांची अविरोध निवड करण्यात आलेली आहे.
जळगाव जिल्हा सहकार बोर्ड ही अनेक वर्षापासून ची संस्था आहे सदर संस्थेचे कामकाज म्हणजे जिल्ह्यातील सहकार संस्थांना मार्गदर्शन करणे विविध कार्यकारी सोसायटी मध्ये कार्यरत असलेले गटसचिव यांना प्रशिक्षण देणे हे काम सहकार बोर्डामध्ये पूर्वीपासून केले जात आहे तसेच या संस्थेमध्ये जळगाव जिल्ह्यातील मान्यवर जेष्ठ पदाधिकाऱ्यांचा सहभाग असायचा तसेच जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन या संस्थेला देखील मोठा इतिहास आहे. तसेच जळगाव जिल्हा कॉटन मार्केटिंग फेडरेशन या संस्थेची स्थापना देखील १९४८ साली झाली होती या संस्थेचे संस्थापक चाळीसगाव तालुक्यातील स्वर्गीय रामराव जीभाऊ पाटील हे होते त्यानंतर या संस्थेत स्वर्गीय दामू भाऊ पांडू पाटील, स्वर्गीय उदयसिंग अण्णा पवार या मान्यवरांनी देखील अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली होती हल्ली विद्यमान अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजय जी पवार हेच आहेत या सहकारी संस्थेत देखील जळगाव जिल्ह्यातील सहकार महर्षी मान्यवरांनी कामकाज केलेले आहे आणि अशा दोन्ही संस्थांच्या संचालक पदी संजय पवार यांचा सहकार क्षेत्रा मध्ये आपल्या कामाचा अनुभव लक्षात घेता संजय पवार यांची बिनविरोध निवड झालेली आहे.